12 मीटरच्या रस्त्यासाठी 28 लाख

पिंपरी – कोकणे चौक ते पार्क रॉयल पर्यंतच्या 12 मीटरच्या रस्त्यासाठी महापालिका तब्बल 28 लाख रुपये मोजणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थापत्य विभागाने बुधवारी (दि. 3) होणाऱ्या स्थायी समिती सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते पार्क रॉयल असा 12 मीटरचा रस्ता हा आधुनिक पद्धतीने विकसीत करण्यात येणार आहे. त्यासाठी अजवानी इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रायवेट लिमिटेड या कंत्राटदाराला 31 लाख 37 हजार 763 रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. यातून रॉयल्टी चार्जेस, मेटेरिअल टेस्टींग चार्जेस वगळण्यात आले आहे.

12.1 टक्के कमी दराने म्हणजे 27 लाख 63 हजार 288 रुपयांना हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ 12 मीटर रस्त्यासाठी सुमारे 28 लाख रुपये मोजले जात असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या आधीच विकसीत असलेल्या रस्त्यासाठी पुन्हा एवढा निधी महापालिका मोजणार असल्याने या रस्त्याचा नेमका काय विकास केला जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)