12 कोटींची अंगठी हरवली

हॉलिवूडची हॉट ऍक्‍ट्रेस आणि पॉप सिंगर पेरिस हिल्टन मध्यंतरी एका नाईट क्‍लबमध्ये एन्जॉय करायला गेली होती. तिथे डान्स करताना तिच्या बोटातली 20 लाख डॉलरची अंगठी कोठेतरी गहाळ झाली. तिच्यासाठी ही अंगठी यापेक्षाही जास्त मौल्यवान होती. कारण ती तिला तिच्या भावी नवऱ्याने एंगेजमेंटला दिलेली भेट होती. डान्स करताना पेरिस जोरजोराने हात हालवत होती. याच दरम्यान तिच्या बोटातून ती अंगठी निसटली आणि कोठे तरी लांब जाऊन पडली. यावेळी क्‍लबमध्ये खच्चून गर्दी होती आणि क्‍लबमध्ये डान्स अवर सुरू असल्याने अंधार होता. त्यामुळे ही मौल्यवान अंगठी शोधणार तरी कसे? या चिंतेने पेरिसला अक्षरशः रडू कोसळले.

डान्स थांबला, लाईट लावले गेले, सिक्‍युरिटी गार्डनी गेटवरून बाहेर जाणाऱ्यांना रोखले. शोधाशोध सुरू झाली. पण अंगठी काही केल्या सापडेना. त्यावेळी पेरिस हिल्टनचा भावी नवरा क्रिस जिल्का याने डोकॅलिटी चालवली. त्याने क्‍लबच्या व्हीआयपी सेक्‍शनमध्ये जाऊन शोधाशोध सुरू केली. एका आईस बॉक्‍समध्ये त्याला पेरिसची अंगठी सापडली. डान्स सुरू असताना जवळच्या टेबलावरच्या आईस बकेटमध्ये अंगठी पडली असावी, या अंदाजाने त्याने घेतलेला शोध यशस्वी झाला. हरवलेली अंगठी सापडल्यावर मात्र पेरिस हिल्टनला आनंदाश्रु थांबवणे कठीण झाले.

तिने हा सगळा किस्सा नंतर सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा प्रसंग आपल्यासाठी खूपच क्‍लेषदायक होता. आयुष्यातील सर्वात भीतीदायक अनुभव असे मी या क्षणाचे वर्णन करेन. ही अंगठी किती मौल्यवान होती हे माझे मलाच माहिती आहे, असे ती म्हणाली.
पेरिस आणि अभिनेता क्रिस यांचे लग्न जानेवारीमध्ये ठरले. आपल्या एंगेजमेंटचा व्हिडीओ पोस्ट करून पेरिसनेच ही बातमी सगळ्यांना सांगितली होती. याच व्हिडीओमध्ये क्रिस तिला प्रपोज करताना आणि अंगठी बोटात घालतानाही दिसते आहे. हे दोघेही एकमेकांना गेल्या दहा वर्षांपासून ओळखत आहेत आणि एकमेकांचे चांगले मित्रही आहेत. याशिवाय दोघेही हॉलिवूडमध्ये ऍक्‍टिंग करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)