पुणे – प्रवेशापासून वंचितांना आणखी एक संधी

संग्रहित छायाचित्र

अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी : प्रक्रियेला 13 ऑगस्टपासून होणार सुरुवात

पुणे – अकरावीच्या चौथ्या फेरीनुसार विद्यार्थ्यांना शुक्रवारपर्यंत (दि.10) प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर अकरावी प्रवेश समितीने विशेष फेरी घेण्याचा निर्णय घेतला असून, त्याची प्रक्रिया दि. 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष फेरीला राज्य शासनाकडून अनुमती मिळाली आहे.

-Ads-

सध्या अकरावीची चौथी फेरीनुसार प्रवेश सुरू आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदमुळे गुरुवारी अकरावीचे कोणतेही प्रवेश होऊ शकले नाही. त्यामुळे प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारपर्यंत (दि.10) प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. चौथ्या फेरीनंतर रिक्‍त पदांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर विशेष फेरी होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील सर्व जागा अल्पसंख्याक संस्थांना देण्यात आल्या होत्या. अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्यास्तरावर प्रवेश घेण्याचे सुचित करण्यात आले होते. त्यानुसार या महाविद्यालयांनी प्रवेश केले आहेत. उर्वरित रिक्‍त प्रवेश न्यायालयाच्या आदेशानुसार चौथी फेरीनंतर केंद्रीय प्रवेश समितीकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. त्यानुसार अल्पसंख्याक कोट्यातील रिक्‍त जागा, व्यवस्थापन आणि इनहाऊस कोट्यातील प्रवेश केंद्रीय समितीकडे परार्वित करणे आवश्‍यक आहे. या कोट्यातील सर्व रिक्‍त प्रवेश दि. 11 ऑगस्टपर्यंत वर्ग करावेत, असेही राऊत यांनी सर्व अल्पसंख्याक संस्थांना सूचना केल्या आहेत.

अकरावी विशेष फेरीचे वेळापत्रक
– विशेष फेरीसाठी रिक्‍त जागा जाहीर : 13 ऑगस्ट
– नव्याने अर्ज अथवा पसंतीक्रम बदलणे : 13 व 14 ऑगस्ट
– विशेष फेरीची गुणवत्ता यादी होणार : 18 ऑगस्ट
– विशेष फेरीनुसार प्रवेश घेण्याची मुदत : 18 ते 21 ऑगस्ट

विशेष फेरीसाठी पुढील विद्यार्थी पात्र
– चारही फेरीत प्रवेश न मिळालेले विद्यार्थी
– प्रथम पसंतीक्रम व्यतिरिक्‍त अन्य पसंतीक्रमाचे प्रवेश मिळूनही न घेतलेले विद्यार्थी

पुढील विद्यार्थी विशेष फेरीसाठी अपात्र
– चारही नियमित फेरीतील कोणत्याही फेरीत पहिल्या पसंतीक्रमाचे
– महाविद्यालयात प्रवेश मिळालेले अथवा ते प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)