119 कोटींच्या रस्त्यांच्या कामासही मान्यता

संग्रहित छायाचित्र

पुणे – स्मार्ट सिटी अंतर्गत पुणेकरांना लवकचर स्मार्ट सुविधाही दिल्या जाणार आहेत. त्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून संपूर्ण शहरात ई-कॅरिडोर उभारले जाणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

स्मार्ट सिटी अंतर्गत बाणेर-औंध तसेच बालेवाडी परिसरात साकारण्यात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या विकसनाच्या कामांनाही संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या कामांना सुरूवात न झाल्यास हा निधी परत जाण्याची शक्‍यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय, स्मार्ट सिटी अंतर्गत आणखी 4 प्लेस मेकिंगच्या ठिकाणांची निर्मिती करणे तसेच इतर काही प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली आहे.

-Ads-

मात्र, ज्या कंपनीस रस्ते विकसनाचे काम देण्यात आले आहे त्यांची काम करण्याची क्षमता आहे का त्यांनी या पूर्वी अशी कामे केली आहेत का याचा सविस्तर अहवाल करून संचालकांना द्यावा अशी मागणी चेतन तुपे यांनी या बैठकीत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)