115 वी आगाखान हॉकी स्पर्धा: आर्मी बॉईज बिहार संघ उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल

पुणे : महाराष्ट्र हॉकी संघटना आयोजित 115व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत आर्मी बॉइज बिहार संघाने नागपूर इलेव्हन संघावर मात करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. नेहरूनगर येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर स्पर्धा सुरू आहे.

स्पर्धेत बुधवारी झालेल्या लढतीत आर्मी बॉइज बिहार संघाने नागपूर इलेव्हन संघावर 4-0 ने मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. पहिल्या सत्रात नागपूरने बिहारच्या खेळाडूंना रोखून धरण्यात यश मिळवले. यानंतर दुसजया सत्राच्या सुरुवातीलाच ललितच्या पासवर मुंशी बेंजने अप्रतिम गोल करून बिहार संघाचे खाते उघडले. पुढच्याच मिनिटाला अमेय लखनने (17 मि.) अप्रतिम मैदानी गोल केला. नंतर लगेचच मुंशीने (19 मि.) वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे तिसरा गोल केला आणि बिहार संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. तीन मिनिटांत तीन गोल झाल्याने यातून नागपूरचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. लढतीच्या 48व्या मिनिटाला साजन खन्नाने गोल करून बिहारला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून बिहारने आगेकूच केली.

तत्पूर्वी, झालेल्या लढतीत चंडिगड संघाने पंजाब संघाचे आव्हान 2-0ने परतवून लावले. सुरुवातीला दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. पहिल्या सत्रात 0-0ची कोंडी काही फुटली नाही. दुसजया सत्रात अजय वीरच्या पासवर संदीपसिंगने (24 मि.) पंजाबच्या गोलकीपरला चकवून सुरेख गोल केला आणि चंडिगडला आघाडी मिळवून दिली. मध्यंतराला चंडिगडने 1-0 अशी आघाडी कायम राखली होती. यानंतर 46व्या मिनिटाला प्रिन्स शर्माने गोल करून चंडिगला 2-0 असा विजय मिळवून दिला.

स्पार्टन पुणे संघाला धक्का

यानंतर सेल ओडिसा संघाने स्पार्टन पुणे संघाचे आव्हान 4-1ने परतवून लावले आणि उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यात ओडिसा संघाकडून थॉमस किंगसन (28, 49 मि.) याने दोन, तर सॅम्युएल एक्का (11 मि.), जय पटेल (15 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पुण्याकडून एकमेव गोल रवींद्रसिंग बाजवाने (55 मि.) केला. या स्पर्धेत धडाक्‍यात सुरुवात करण्यात यशस्वी ठरलेल्या स्पार्टन पुणे संघाचा ओडिसासमोर मात्र निभाव लागला नाही.

मुलींमध्ये नागपूरची आगेकूच

मुलींच्या गटात नागपूर संघाने भोपाळवर 1-0ने मात करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यात नागपूरच्या अंशुप्रिया होलेने 17व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. यानंतर शेवटपर्यंत भोपाळला बरोबरी साधता आली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)