सीरियातील गृहयुद्धात गेल्या वर्षभरात 1106 बालकांचा मृत्यू 

न्यूयॉर्क (अमेरिका) – सीरियातील गृहयुद्धात गेल्या वर्षभरात 1106 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती युनिसेफने दिले आहे. सीरियातील गृहयुद्धाच्या गेल्या आठ वर्षांत सन 2018 बालकांसाठी अत्यंत भीषण ठरले असल्याची माहिती सोमवारी युनिसेफने दिली आहे. बालकांसाठी कार्य करणारी युनिसेफ ही राष्ट्रसंघाची संस्था आहे.

सीरियातील गृहयुद्ध संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याची बातमी प्रसिद्ध केली जात असली, तरी ती अत्यंत भ्रामक आहे, वस्तुस्थिती मात्र अत्यंत वेगळी आहे, असे युनिसेफचे कार्यकारी संचालक हेन्रिक एच फोर यांनी सांगितले. बालकांसाठी सध्याचा काळ अत्यंत खडतर असून गेल्या काही दिवसात केवळ इदलिब येथे 59 बालके मारली गेली असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)