1100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कराड, दि. 13 (प्रतिनिधी)- गणेशोत्सवात शांतता भंग होऊ नये, यासाठी कराड उपविभागातील 1100 जणांवर प्रतिबंधात्मक आणि अवैध दारु विक्रेत्या 12 जणांवर मुंबई दारुबंदी कालम 93 नुसार कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 120 जणांना तात्पुरता मनाई (तडीपारी) आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.
ज्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कराड उपविभागातील कराड शहर, कराड तालुका, उंब्रज आणि तळबीड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 1100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये कराड शहरातील 260 जणांचा समावेश आहे. गणेशोत्सवात विघ्न आणू नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसे झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ज्यांच्यावर यापूर्वी अवैध दारु विक्रीचे गुन्हे आहेत. अशा उपविभागातील 12 जणांवर मुंबई दारुबंदी कालम 93 नुसार कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय उपविभागातील 120 जणांना तात्पुरता मनाई (तडीपारी) आदेश देण्यात आला आहेत. संबंधितांनी या नोटीशीचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)