मतदानासाठी 11 प्रकारची ओळखपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

पुणे – लोकसभा निवडणुकीकरिता मतदार छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त 11 प्रकारची छायाचित्र ओळखपत्रे या निवडणुकीत मतदान करण्याकरिता पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत. यामध्ये आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक आदींचा समावेश आहे.

मतदानासाठी कोणकोणती ओळखपत्रे या निवडणुकीत ग्राह्य धरता येणार आहेत, याबाबतचे परिपत्रक निवडणूक आयोगाने काढले आहे. या परिपत्रकानुसार मतदारांकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसेल तर अकरा छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदाराने मतदान करताना पुरावा म्हणून सादर करणे आवश्‍यक आहे. या ओळखपत्राच्या आधारे मतदाराला मतदानाचा हक्‍क बजावता येणार आहे. याचबरोबर मतदाराने मतदानासाठी कोणता पुरावा सादर केला आहे, याची नोंद मतदान केंद्राध्यक्ष हे रजिस्टरमध्ये करणार असून ओळखपत्राचा क्रमांकही या रजिस्टरमध्ये नोंदविण्यात येणार आहे.

मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणारी ओळखपत्रे
1) पासपोर्ट 2) ड्रायव्हिंग लायसन्स 3) राज्य व केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्रातील, पब्लिक लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले ओळखपत्र 4) बॅंक व पोस्ट कार्यालयाने फोटोसह दिलेले पासबुक 5) पॅन कार्ड 6) आधार कार्ड 7) राष्ट्रीय जनसंख्या रजिस्ट्रारने दिलेले स्मार्ट कार्ड 8) मनरेगा जॉब कार्ड 9) श्रम मंत्रालयाच्या योजनेद्वारे दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड 10) पेन्शन ओळखपत्र 11) खासदार, आमदार यांना दिलेले ओळखपत्र.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)