जम्मू काश्‍मीरात बस उलटून 11 ठार

जम्मू: जम्मू काश्‍मीरच्या पुंछ जिल्ह्यात एक प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या दुर्घटनेत किमान अकरा जण ठार झाले तर अन्य 19 जण जखमी झाले आहेत. ही बस लोरान हून पुंछ कडे येत होती त्यावेळी वाटेत एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटून ही दुर्घटना घडली. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

ही बस ज्या ठिकाणी उलटली त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला दरीसारखा भाग होता. बस त्यात शंभर मीटर आत कोसळली. स्थनिक नागरीकांनी अपघातग्रस्तांना तेथून बाहेर काढून रूग्णालयात दाखल केले. तथापी त्यांना ही मदत मिळण्यास झालेल्या विलंबामुळे अनेकांना तेथेच प्राण गमवावे लागले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)