11 हजार 765 वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण

पिंपरी- भारत स्वच्छ अभियानाअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानात शहरात 11 हजार 765 वैयक्तिक शौचालयांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याकरिता केंद्र व राज्य सरकारकडून 14 कोटी, चार लाख, 49 हजार, 935 रुपयांचा हप्ता प्राप्त झाला आहे. केंद्र, राज्य व महापालिकेच्या वतीने दिलेल्या आर्थिक अनुदानातून या शौचालयांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जात आहे. 2-11 च्या जणगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहरातील 11 हजार 684 कुटुंबांकडे शौचालय नसल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यासाठी झालेल्या सर्वेक्षणानुसार या सर्व कुटुंबांना शौचालय उभारण्यासाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकारचे आठ हजार रुपये, राज्य सरकारचे आठ हजार रुपये तर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चार हजार रूपये असे एकूण 16 हजार रूपये आर्थिक अनुदान उपलब्ध करुन दिले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अभियानाअंतर्गत केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 15 हजार 290 अर्ज प्राप्त झाले होते. वैयक्तिक शौचालयासाठी एकूण 12 हजार 290 अर्ज स्वच्छ भारत अभियानाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. याशिवाय 203 महिला व 262 पुरुष शौचालये अशी एकूण 465 (सीटस) सामुदायिक शौचालयांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात 8 हजार 547 लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या व युएलबीचा एकूण 6 कोटी 83 लाख 76 हजार रुपयांचे अर्थिक अनुदान प्राप्त झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 661 लाभार्थींना 6 कोटी 12 लाख 88 हजारांचे अनुदान याच धर्तीवर प्राप्त झाले आहे.

शहरात स्वच्छता राखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविला जाणारा हा चांगला उपक्रम आहे. नागरिकांचा देखील त्याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आजार पसरण्यास अटकाव होणार आहे. याकरिता सर्व नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे आवश्‍यक आहे.
– जीवन लोंढे, नागरिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)