11 हजार 310 नागरिकांना “स्वाईन फ्लू’ची लस

पिंपरी – शहरात “स्वाईन फ्लू’ने जानेवारी महिन्यापासून कहर केला होता. या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी “स्वाईन फ्लू’ची लस देण्यात येते. शहरात हा आजार बळावल्यानंतर जानेवारी महिन्यापासून अद्यापपर्यत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे “स्वाईन फ्लू’ची लस अकरा हजार तीनशे दहा नागरिकांना देण्यात आली आहे. सध्या लसीचा पुरवठा सुरळीत झाल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

मधुमेह रुग्ण, गर्भवती महिला, विद्यार्थी व अतिजोखमीच्या रुग्णांना स्वाईन फ्लू लस देण्यात आली आहे. या आजाराने शहरात थैमान घातले होते. या आजाराने अद्यापपर्यत पिंपरी-चिंचवड शहरात 33 रुग्ण तर राज्यभरात 268 रुग्ण दगावले आहेत. “स्वाईन फ्लू’ची लागण राज्यातील पुणे, नाशिक, सातारा या जिल्ह्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. यामुळे, आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक लस उपलब्ध करुन दिली जात आहे. “स्वाईन फ्लू’ने पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. मात्र, गेल्या चार महिन्यात झपाट्याने वाढ होऊन तब्बल 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“स्वाईन फ्लू’चा राज्यभरातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने महापालिका रुग्णालयात मोफत लस उपलब्ध करुन दिली. याचा सर्वसामान्य नागरिकांना निश्‍चितपणे फायदा झाला आहे. मात्र, महापालिका स्वायत्त संस्था असल्याने या रुग्णालयात राज्य शासनाने लस उपलब्ध करुन देण्यास नकार दिला. यामुळे, पिंपरी-चिंचवड महापालिकेला “स्वाईन फ्लू’ची लस खरेदी करताना धावपळ उडाली होती. या आजाराला रोखण्यासाठी ही लस प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

“स्वाईन फ्लू’ हा जीवघेणा आजार रोखण्यासाठी वापरण्यात येणारी प्रतिबंधत्मक लसीचा तुटवडा सप्टेंबर महिन्यात जाणवला होता. ही लस तयार केल्यानंतर केवळ तीन महिन्याच्या कालवधीत त्याचा वापर करु शकतो. यामुळे, राज्यभरात पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही लस कमी प्रमाणात बनविण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात “स्वाईन फ्लू’चा प्रादूर्भाव अचानक वाढल्याने राज्यभरात लसीचा तुटवडा जाणवल्याने प्रशासनाची धांदल उडाली होती.

“स्वाईन फ्लू’ लस घेतलेली आकडेवारी (जानेवारी ते 20 ऑक्‍टोबर)
गरोदर महिला : 9064
मधुमेह, उच्च रक्तदाब : 1644
महापालिका कर्मचारी : 602

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)