11 फेब्रुवारीला अर्ध मॅरेथॉन स्पर्धा 

प्रभात वृत्तसेवा 
पुणे, दि. 28 – रोटरी क्‍लब ऑफ निगडी-पुणे तर्फे 11 फेब्रुवारीला (रविवारी) निगडी प्राधिकरण येथे आठव्या “रनेथॉन ऑफ होप 2018′ या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही मॅरेथॉन महाराष्ट्र ऍथलेटिक असोसिएशनचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. निगडी प्राधिकरण येथे संत तुकाराम उद्यानाशेजारील मैदानावरून (सिटी प्राईड स्कूलजवळ) सकाळी पावणेसहा वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. ही स्पर्धा चॅरिटी आणि स्पर्धा या दोघांचा संगम असून त्यात एकाच दिवशी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती होणार आहेत. ही स्पर्धा मुले-मुली तसेच स्त्री-पुरूष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात पार पडेल.
निगडी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी म्हणाले, अशा प्रकारच्या लोकप्रिय आणि सहभागाच्या दृष्टीने महत्वाच्या स्पर्धेचे आयोजन करताना अतिशय अभिमान वाटत आहे. खेळाला प्रोत्साहन देऊन फिटनेसबाबत जागृती करणे यासह वेगवेगळ्या संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या सोशल सर्व्हिस प्रोजेक्‍ट्‌साठी मदत निधी उभारणे हा आमचा उद्देश आहे. “गरजू व्यक्तींपर्यंत पोहचून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे’ हे यंदाच्या “रनेथॉन फॉर होप’चे घोषवाक्‍य आहे.
माजी अध्यक्ष डॉ. संजय देवधर म्हणाले की, सहभागी स्पर्धकांसाठी रनेथॉन नेहमीच जीवनाच्या वेगवेगळ्या प्रवासातून जात असते. केवळ मदत निधी उभारणे एवढाच या स्पर्धेमागचा उद्देश नसून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मात्र एकच छंद आणि आवड असणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा रोटरी क्‍लबचा या उपक्रमामागील हेतू आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)