11 प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व

प्रभाग समितीचे नाव नवनिर्वाचित अध्यक्षाचे नाव
औंध-बाणेर-बालेवाडी – अमोल बालवडकर (भाजप)
शिवाजी-घोले रस्ता – स्वाती लोखंडे (भाजप)
सिंहगड रस्ता – अनिता कदम (भाजप)
वानवडी-रामटेकडी – ऍड. अब्दुल गफूर अहमद पठाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
कोंढवा-येवलेवाडी – वीरसेन बापू जगताप (भाजप)
कसबा-विश्रामबागवाडा – योगेश समेळ (भाजप)
बिबवेवाडी – रुपाली धाडवे (भाजप)
नगररस्ता – श्वेता गलांडे-खोसे (भाजप)
येरवडा-कळस-धानोरी – अनिल टिंगरे (बॉबी) (भाजप)
ढोले-पाटील – लता राजगुरू (कॉंग्रेस)
कोथरूड-बावधन – अल्पना वरपे (भाजप)
धनकवडी-सहकारनगर – बाळाभाऊ धनकवडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
वारजे-कर्वेनगर – दीपक पोटे (भाजप)
हडपसर-मुंढवा – हेलमता मगर (राष्ट्रवादी कॉंग्रेस)
भवानी पेठ – मनिषा लडकत (भाजप)

राष्ट्रवादी कॉंग्रेस- 3, कॉंग्रेसला एक अध्यक्षपद

पुणे – महापालिकेच्या 15 प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत साहजिकच भापपला 11 प्रभाग समितींचे अध्यक्षपद, तर उर्वरित चार प्रभाग समित्यांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तीन, तर कॉंग्रेसला एक अध्यक्षपद मिळाले.

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी समान मते असल्याने चिठ्ठ्या टाकण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कॉंग्रेसच्या बाजूने कौल मिळाला. त्यामुळे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नगरसेविका लता राजगुरू यांची निवड झाली. भाजपचे सर्वाधिक 98 नगरसेवक निवडून आले आहेत. त्याशिवाय प्रभाग समित्यांच्या रचना करताना सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या वाट्याला सर्वाधिक अध्यक्षपद कसे मिळतील, याचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे 15 प्रभाग समित्यांपैकी जवळपास 11 प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे अध्यक्ष निवडले गेले आहे. त्यात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये भाजप आणि विरोधकांचे बलाबल सारखे आहे. या ठिकाणी चिठ्ठ्या टाकून अध्यक्षपदाचा कौल घेतला जातो. त्यानुसार सोमवारी टाकण्यात आलेल्या चिठ्ठ्यांमध्ये कॉंग्रेसच्या बाजूने नशिबाने साथ दिल्याने कॉंग्रेसच्या नगरसेविका लता राजगुरू या अध्यक्षा बनल्या आहेत.

भाजपला मिळालेल्या 11 प्रभाग समित्यांपैकी सहा प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली. या सहा पैकी काही ठिकाणी विरोधकांना निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार नव्हता आणि उमेदवार असला तरी सूचक नसल्याने या प्रभाग समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. विरोधकांना सर्व ठिकाणी निवडणुकीला सामोरे जावा लागले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)