11 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत लष्करी संचलन

वॉशिंग़्टन (अमेरिका) – आगामी 11 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत लष्करी संचलन करण्यात येणार आहे. पेंटॅंगॉनमधून तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक देशांत लष्कराचे संचलन नियमित रूपाने केले जाते. भारतात दर वर्षी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत भारत आपल्या लष्करी सामर्थ्याची झलक दाखवतो. मात्र अमेरिकेत नियमित पद्धतीने लष्करी संचलन करण्याची पद्धत नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्डस्‌ ट्रम्प हे मागील वर्षी फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्समध्ये लष्करी संचलन पाहिले होते. फ्रान्समध्ये दरवर्षी बास्तिल डे’ला लष्करी संचलन करण्यात येते. फ्रान्समधील लष्करी संचलनाने प्रभावित झालेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेतही लष्करी संचलनाचा निर्णय घेतला होता. या पूर्वी अमेरिकेत सुमारे तीन दशकांपूर्वी, 1991 साली लष्करी संचलन करण्यात आले होते. त्या वर्षी इराकमध्ये सद्दाम हुसेनच्या इराकी सैन्यावर विजय मिळवल्यानंतर हे संचलन आयोजित करण्यात आले होते.

11 नोव्हेंबर हा दिवस अमेरिकेत दिग्गज दिन (व्हेटरन्स डे) म्हणून साजरा करण्यात येतो. या वर्षी होणाऱ्या संचलनात अमेरिकन स्वातंत्र्य युद्धापासून ते आजतागायत झालेल्या युद्धांत सैनिकांनी दिलेले योगदान हे मुख्य आकर्षण असणार आहे.

व्हाईट हाऊस पासून कॅपिटलपर्यंत सुमारे 1.6 किमी हे संचलन असणार आहे. दिग्गज सैनिकांचा सन्मान हा या संचलनाचा मुख्य हेतू आहे. व्हाईट हाऊसपासून निघालेल्या संचलनाचे कॅपिटल येथे अध्यक्ष डोनॉल्ड्‌ ट्रम्प स्वागत करतील. त्यांच्याबरोबर दिग्गज अधिकारी आणि पदक विजेते सैनिक असतील.

या संचलानात केवळ चाके असलेली वाहने सहभागी होणार आहेत. रस्ते खराब होण्याच्या शक्‍यतेमुळे रणगाड्यांचा समावेश करण्यात येणार नाही. आणि केवळ जुनी उपलब्ध विमानेच संचलनात सहभागी होतील असे सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)