11 अजगर पाळले आणि…

पाळीव प्राण्यांची हौस अनेकांना असते. मात्र सार्वजनिक स्थळी घेऊन गेल्यावर या प्राण्यांमुळे कोणाला उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यायची असते. तशी ती न घेतली गेल्यामुळे अलीकडील काळात “पेटस्‌ नॉट अलाऊड’ असे फलक झळकलेले दिसतात. विशेषतः पाश्‍चिमात्य राष्ट्रांमध्ये असे फलक अनेक ठिकाणी दिसतात. त्यावरून काही जण वादही घालतात. कारण आपल्या तुलनेने तिकडे पाळीव प्राण्यांची हौस जास्त आहे.

हौसेने कुत्रे-मांजर पाळणे वेगळे आणि मगर-साप पाळणे वेगळे. मात्र या पाश्‍चात्यांच्या हौसेला मोल नाही आणि अक्‍कलही नाही. अमेरिकेत ओहायोमधील एका महिलेने घरात चक्‍क नऊ अजगर पाळले होते. हे कमी होते म्हणून की काय तिने आणखी दोन अजगर घरी आणले. त्यापैकी पाच फूट सहा इंच लांबीच्या एका अजगराने एकदा तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्यावर बाईला शुद्ध आली! ही महिला पाळलेल्या अजगरांना आपल्याबरोबर घेऊन पार्कमध्येही फिरत असे.

अर्थातच शेजारपाजाऱ्यांना आणि पार्कमध्ये येणाऱ्या लोकांना हा प्रकार विचित्र व धोकादायक वाटत होता. या महिलेला मात्र त्याची फिकीर नव्हती. या अकरा अजगरांसह ती सुखेनैव राहत होती. ही महिला “सर्पमैत्रीण’ होती आणि नवे आणलेले अजगर तिने वाचवलेले होते.

-Ads-

मात्र बोआ कन्स्ट्रिक्‍टर जातीच्या एका अजगराने एकदा तिला विळखा घालून तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न चालवला. तो तिच्या नाकाचा चावा घेऊन डोके गिळण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी तिने प्रसंगावधान राखून सर्पतज्ज्ञांना फोन केला आणि स्थितीची माहिती दिली. चारच मिनिटात हे बचावदल तिच्या घरी पोहोचले. त्यांनी तात्काळ अजगराचे डोके कापून त्याला तिच्यापासून वेगळे केले व या महिलेला रुग्णालयात पोहोचवले. यानंतर तिने घरातील सर्व अजगर इष्ट स्थळी पोहोचवले आहेत!

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
2 :joy:
4 :heart_eyes:
1 :blush:
1 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)