108 ठिकाणी डायलिसिस सेंटर…

मुंबई – सिद्धीविनायक ट्रस्टमार्फत देण्यात आलेल्या देणगीच्या माध्यमातून राज्यात 108 ठिकाणी डायलिसिस सेंटर येत्या दोन महिन्यात सुरु करण्यात येणार असून यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर, बीड, सांगली, औरंगाबाद येथे अर्ली डिटेक्‍शन सेंटर सुरु केले जाणार आहे.

अमरावती येथे ट्रामा केअर सेंटर सुरु करतानाच अकोला, यवतमाळ, नागपूर या वैद्यकीय महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. नागपूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. वैद्यकीय बॉन्डची अंमलबजावणी प्रभावी व पारदर्शकपणे व्हावी याकरिता त्याची कार्यप्रणाली ऑनलाईन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)