बेमुदत संपावर जाणार 108 चे कर्मचारी

नागठाणे, दि. 8 (प्रतिनिधी) –
आपल्या विविध मागण्यासाठी 108 या अतितातडीच्या रुग्णवाहीकेच्या डॉक्‍टर व ड्रायव्हर यांनी दि. 12 पासून बेमुदत संप पुकारला आहे.
या बेमुदत संपाचे निवेदन त्यांनी शासनास व बी. व्ही. जी. या कंपनीस दिले आहे. महाराष्ट्र सरकारने जनतेसाठी तातडीची आरोग्य सेवा म्हणून 108 ही रुग्णवाहिका सेवा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे ही सेवा देण्याकरिता बी.व्ही.जी. इंडिया लि. या कंपनीसोबत रीतसर करारनामा केला आहे. या करारनाम्या मध्ये सर्व कर्माचाऱ्यांना कामगार कायद्याचे लाभ व फायदे देण्यासंदर्भात ठरले आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना किमान वेतनापेक्षा अत्यंत कमी दिले जात आहे. तसेच दररोज 12 तास काम करावे त्याचे वाढीव वेतन दिले जात नाही त्याच बरोबर या कर्मचाऱ्यांना कोणताही भत्ता,सुरक्षितता याची हमी, या कामगारांचा विमा असे कोणतेही लाभ या कर्मचाऱ्यास मिळत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांवर उचित तोडगा निघाला नाही तर दि. 12 पासून बेमुदत संप करण्याचा इशारा या संघटनेमार्फत शासनास व बी. व्ही. जी. कंपनीस दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1238 :thumbsup: Thumbs up
9 :heart: Love
5 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
163 :blush: Great
17 :cry: Sad
9 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)