दगडफेक-रास्ता रोकोप्रकरणी 1,035 गुन्हे

मराठा समाज आंदोलन : 45 जणांना अटक, कोथरुड पोलिसांची कारवाई

पुणे- मराठा समाज आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदमध्ये कोथरुड परिसरात तीव्र पडसाद उमटले होते. यामध्ये रस्ता रोको करण्याबरोबरच पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली होती. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी दहा गुन्हे नोंदवले असून त्यामध्ये तब्बल 1,035 जणांना आरोपी केले आहे. यामधील 45 जणांना अटक करण्यात आली आहे.

-Ads-

बंददरम्यान कोथरुड पोलीस ठाणे हद्दीत पौड रोड येथील मुंबई-पुणे हाय-वे पुलाखाली तसेच पौड रस्त्यावरील लोकमान्य वसाहतीजवळ पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी दाखल दोन गुन्ह्यांमध्ये 45 जणांना अटक करण्यात आली असून 250 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर उर्वरीत 9 प्रकरणांत 725 जणांना आरोपी करण्यात आले आहे.

प्रकरण क्र. 1
पोलिसांवरील दगडफेकीच्या पहिल्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सत्यवान पाटील यांनी फिर्याद दिली आहे. आंदोलन संपल्यानंतर दुपारी 1च्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून कोथरुड-पौड रस्ता बंद केला होता. जागेवरून उठण्यासाठी पोलिसांनी त्यांना ध्वनिक्षेपकावरुन विनंती केली होती. परंतू, सूचना न जुमानता त्यांनी आरडा-ओरडा केला. त्यांना उठवून रस्ताच्या कडेला करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अचानक पोलिसांच्या दिशेने दगड आणि काचेच्या बाटल्याही फेकल्या. यामध्ये एक बस आणि खाजगी वाहनांच्या काचा फोडून 25 हजारांचे नुकसान केले आहे. तसेच बंदोबस्तावरील वाहनाची काच फोडून शासकीय मालमत्तेचे 20 हजार रुपयांचे नुकसान केल्याचे म्हटले आहे.

प्रकरण क्र. 2
दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस उप निरीक्षक पी. एन. जर्दे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये 19 जणांना अटक करण्यात आली असून आणखी 200 ते 250 जणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये लोकमान्य वसाहतीजवळ जमावाने रस्त्यावर टायर जाळून स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पुरविण्यात आलेल्या सायकल पेटवल्या. तसेच मेट्रोच्या कामासाठी आणलेले साहित्य रस्त्यामध्येच टाकून दहशत पसरवली. येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दगड आणि बॉटल फेकत हल्ला केला.

अटक केलेल्यांची नावे : चेतन मारुती कोंढळकर (26), केतन विलास अमराळे (24), नामदेव लहु तोंडे (24), संदीप विश्‍वास पवार (22), रोहीत रामकृष्ण देशपांडे (20), निलेश अंकुश देशमुख (31), सागर शहाजी दंडनाईक (23), ओंकार राजेंद्र जगताप (20), सागर उत्तम जगताप (29), कौस्तुभ संजय फाटक (21), नवीन भानुदास मंडले (30), विष्णु भाऊ वांजळे (23), राहुल विजय भिलारे (25), नीलेश नारायण कोंढाळकर (25), अनिल किसन मेंगडे (19), अक्षय राजेंद्र माझिरे (24), तुषार नथु जोरी (27), विकास गणपत खिलारे (22), रोहित विष्णु पोकळे (19), प्रसाद अशोक शिंदे (23, सर्व रा. कोथरुड) शुभम महादेव नलावडे (19, रा. पाषाण),किरण गुलाब उभे (28, रा. मुळशी), अभिजित भालचंद्र धुमाळ (21,रा.मुळशी), सुनील सहादु शिळीमकर (25, रा. मुळशी), कैलास अंकुश वाघ (20), अमित शंकर पवार (22), ऋषिकेश बंडु मेगडे (20), सुरज दत्तू येनपुरे (30), तन्मय पुंडलिक तनपुरे (23), अमित राजेंद्र येनपुरे (2), अभिषक अरविंद भंडारी (21), यशोधन लिलाधर सरोदे (23), कैलास कानिफनाथ फासगे (28), सूरज नथुराम पारट (23), वैभव सत्तु फाटक (21), कृष्णा गणपत पडवळ (23), वसिम पिरमा मुल्ला (21), तुकाराम शिरपती कुडले (32), संतोष वसंत सातपुते (21), पवन मोहनराव भोसले (29), कुणाल लहु मालपोटे (19, सर्व रा. कोथरुड, कानिफनाथ सर्जेराव जरंग (33,रा. किरकटवाडी), विनायक छबन कंधारे (24, रा. मुळशी), सौरभ नामदेव चौंधे (20, रा. भुगाव)

डेक्‍कन पोलिसांनीही 21 जणांना केली अटक
मराठा आरक्षण आंदोलन बंददरम्यान खंडुजीबाबा चौकात रस्ता अडवल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी 21 जणांना अटक केली आहे. शांततेत पार पडत असलेल्या मोर्चामध्ये घुसत सार्वजनिक रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबिकर यांनी फिर्याद दिली आहे.

महेश राजेंद्र यादव (28, रा. धायरी), सुधाकर सूर्याजी कदम (27, पिंपरी-चिंचवड), किरण सोपान जाधव (33, रा.शिवणे), प्रवीण गोविंद चव्हाण (27,रा.वडारवाडी), गोविंद बापुराव केंद्रे (36, रा. मॉडेल कॉलनी), संजित विलास वाघमारे (25, रा. पांडवनगर), ओंकार पांडुरंग यादव (20, रा. शिवाजीनगर गावठाण), ओंकार दत्तात्रय चितळकर (18,रा.औंधगाव), रमेश दत्तु पवार (33,रा. जत, जि. सांगली), रामदास माधवदास वाडकर (20,रा. शिंदेवाडी, कात्रज बोगदा), प्रशांत बाळासाहेब आरेकर (18, रा. नवी सांगवी), मयुर प्रकाश माने (24,रा.निगडी), रितीक बाळासाहेब कदम (18 ,रा.औंध), रेहित प्रताप मोरे (24,रा.नवले ब्रीज), निरंजन जयंत जाधव (20,रा.जनवाडी), नीलेश रमेश धुमाळ (25, रा.नऱ्हे), ऋषिकेश दत्तात्रय उभे (33, रा. कोथरुड), प्रदीप ज्ञानोबा भोसले (24, रा.भोर), सुमीत शहाजी भोसले (22, रा. नवी पेठ), महेश रमेश माने (20, रा.दिघी) आणि शुभम राजु परदेशी (21,रा. शिवाजीनगर गावठाण) अशी अटक व्यक्तींची नावे आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)