१०० वैज्ञानिक, २ वर्ष; असे पूर्ण झाले ‘मिशन शक्ती’ 

नवी दिल्ली – भारताने अंतरीक्षातील उपग्रहावर क्षेपणास्त्र हल्ला करून तो नष्ट करण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून त्यामुळे भारताच्या अंतरीक्ष क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. या  आज प्रत्येक भारतीय गर्व करत आहे. परंतु, हे मिशन एवढेही सोपे नव्हते. डीआरडीओचे चेअरमन जी. एस. रेड्डी यांनी सांगितले कि, या प्रोजेक्टवर मागील सहा महिन्यांपासून मिशन मोडवर काम सुरु होते. तर मागील २ वर्षांआधीच या प्रोजेक्टवर काम सुरु झाले होते.

जी. एस. रेड्डी म्हणाले कि, सहा महिन्यांपासून १०० वैज्ञानिक सातत्याने या प्रोजेक्टवर काम करत होते. सोबतच या प्रोजेक्टचे संपूर्ण अपडेट्स राष्ट्रीय सल्लागार अजित डोभाल यांना दिले जात होते. व ही माहिती अजित डोभाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना देत होते.

आम्ही आमच्या टार्गेटला ‘कायनेटिक किल’ म्हणजेच थेट उपग्रहाला निशाणा केला आहे. यासाठी अनेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे सर्व टेक्नॉलॉजी भारतात तयार झाल्या असून परीक्षण यशस्वी झाले.

A-SAT मिसाईलबाबत माहिती देताना जी. एस. रेड्डी म्हणाले कि, मिसाईल लो अर्थ बिट म्हणजेच LOE उपग्रहाला लक्ष्य बनविण्यास सक्षम आहे. आमच्याकडे यापेक्षाही मोठे लक्ष्य भेदण्याची ताकद आहे. परंतु, आम्ही पहिले LOE ला टार्गेट बनविण्याचे ठरविले होते. आम्हाला कोणत्याही अन्य देशाला नुकसान पोहोचवायचे नव्हते.

दरम्यान, अशी क्षमता प्राप्त करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)