लिगो इंडिया प्रकल्पासाठी 100% जमीन अधिग्रहित

पंतप्रधान मोदींच्या हस्ते लवकर भूमिपुजन

हिंगोली; आशिया खंडातील पहिला आणि जगातील तिसऱ्या लिगो इंडिया प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारी जमीन 100% अधिग्रहित झाली आहे. या प्रकल्पाचे कामकाज इस्रो, आयुका आणि नासा या संस्थांच्या वतीने करण्यात येत आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकी अंतराळ संस्था नासा आणि भारतीय अंतराळ संस्था इस्रो आणि आयूका यांच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका सरकार ब्रह्मांड ध्वनीचा अभ्यास करण्यासाठी लिगो प्रकल्प औंढा नागनाथ तालुक्‍यातील दुघाळा, सावळी, अंजनवाडा आदी गावांच्या क्षेत्रात स्थापन करणार आहे.

या प्रकल्पाला तीन वर्षांपूर्वी मान्यता मिळाली असून सुमारे 300 हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारी जमीन वन, महसूल विभाग आणि खासगी मालकीच्या शेतकऱ्यांकडून शासनाच्या वतीने अधिग्रहीत करण्यात आली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत सर्व जमीन या प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संभावित दौरा फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्‍यता असून त्यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)