100 रुग्णांची हत्या केल्याची रूग्णसेवकाची कबुली 

ओल्डेनबर्ग, (जर्मनी): पूर्वाश्रमीच्या परिचारकाने आपल्या कारकिर्दीदरम्यान तब्बल 100 रुग्णांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. नीस होगेल असे या परिचारक पुरुषाचे नाव आहे. होगेलवरील खटल्याच्या पहिल्याच दिवशी त्याने ही कबुली दिली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी होगेल याने यापूर्वीच दशकभराचा तुरुंगवास भोगलेला आहे.

रुग्णांना अखेरच्या क्षणी बरे करण्यासाठीच्या मान्यताप्राप्त औषधांचे ओव्हरडोस तो देत असे. ओल्डेनबर्ग येथील रुग्णालयामध्ये किमान 36 रुग्णांचा अशा औषधांच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता. तर डेल्मेनहोर्स्ट येथील रुग्णालयात किमान 64 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही ठिकाणी होगेल हा 2000 ते 2005 दरम्यान कामाला होता. 2005 साली प्रिस्क्रीप्शनमध्ये नमूद न केलेल्या औषधाचे इंजेक्‍शन रुग्णाला देत असताना त्याला पकडले गेले होते. 2008 साली त्याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला गेला आणि 7 वर्षांची शिक्षा त्याला सुनावली गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हत्येच्या प्रयत्नातील अन्य 5 प्रकरणातही त्याला दोषी ठरवले गेले आणि 15 वर्षांची शिक्षा सुनावली गेली. होगेलच्या ओव्हरडोसमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून 135 मृतदेह थडग्यातून उकरून पुन्हा बाहेर काढण्यात आले. एकूण 200 पेक्षा अधिक जणांना होगेलमुळे जीव गमवावा लागला असावा असा तपास अधिकाऱ्यांचा संशय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)