कोल्हापूर: नातेवाईकांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षाच्या चिमुरडीचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. नातेवाईकांनी जड अंतकरणाने तिचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.समृद्धी अमित सूर्यवंशी असे या मुलीचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना रंकाळा परिसरातील खणीमध्ये घडली.
सुट्टीच्या काळात ते नेहमी पोहायला जात होती. आज सकाळीही ती पोहायला गेली असता अचानक पाण्यावर तरंगायला लागली. त्यामुळे नातेवाईकांनी तिला बाहेर काढले. अत्यावस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यामध्ये तिचा मृत्यू झाला. समृद्धी ही बालवक्ता म्हणून देवकर पाणंद परिसरात प्रसिद्ध होती. तिच्या आशा अचानक जाण्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत.