परीक्षेआधीच दहावीचा पेपर व्हॉट्सअपवर  

भिवंडी – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे पेपर परीक्षेआधीच सोशल माध्यमांवर झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज असणाऱ्या दहावीच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर, परीक्षा सुरु होण्याआधीच अर्धा तास अगोदर व्हॉट्सअप या सोशल माध्यमावर व्हायरल झाला. तसेच १५ मार्च आणि १८ मार्च रोजी झालेल्या विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याचे देखील समोर आले होते. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे पपेरफुटी संदर्भात विशेष काळजी घेण्यात येत होती, तरी देखील असे प्रकार थांबविण्यात यश आले नसल्याचे दिसून येत आहे.

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे शेतकरी उन्नती मंडळाच्या परशुराम धोंडू तावरे विद्यालयातील तर, राहणाल येथील होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये परीक्षा सुरु होण्याआधीच पेपर आढळून आला. यासंदर्भात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here