राफेल करारावरून लक्ष हटवण्यासाठीच १०% आरक्षणाची खेळी : चंद्राबाबू नायडू

अमरावती : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज केंद्राकडून आर्थिक मागासांना देण्यात आलेल्या १०% आरक्षणावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. चंद्राबाबू म्हणाले की, “केंद्राने घोषित केलेले १०% आरक्षण हे केवळ आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन देण्यात आले असून राफेल घोटाळ्यावरून देशातील जनतेचे लक्ष विचिलित करणे हा देखील सरकारचा या मागचा हेतू आहे.”

“असे असले तरी आम्ही आर्थिक मागासांना देण्यात आलेल्या १०% आरक्षणाच्या निर्णयाला पाठिंबा देत आहोत.” असं देखील ते एका कार्यक्रमामध्ये ते म्हणाले.

“सरकारच्या या निर्णयाला आमचा पाठिंबा असला तरी आम्ही वाल्मिकी समाजास एसटी कोट्यामधून, धोबी समाजास एससी कोट्यामधून आरक्षण मिळावे यासाठीचा केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा.” अशी मागणी देखील त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)