आंध्रप्रदेशच्या खाणीत स्फोट; १० जणांचा मृत्यू

अमरावती- आंध्रप्रदेशातील कूर्नोल जिल्ह्यातीळ खाणीमध्ये झालेल्या एका स्फोटात १० जण मृत्युमुखी पडले आहे.

ते सर्व कामगार ओडिशा येथील होते तर त्यांना कामासाठी आंध्रमध्ये आणले गेले होते. दररोजचे  साधारण खाणकाम चालू असताना स्फोट झाला. अशी माहिती तपास अधिकाऱ्याने फोनवर दिली.

-Ads-

अधिकारी म्हणाले, “गेलेटाइन स्टिकचा वापर करून स्फोट घडविण्याच्यावेळी तेथे २० कामगार असल्याची माहिती आहे. त्या स्फोटाने तेथील कामगारांना विळख्यात घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला.”

पुढे बोलताना तपास अधिकाऱ्याने सांगितले की, जवळजवळ १० जण मृत्युमुखी पडले आहेत तर ४ जण जखमी आहेत. सर्वांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आणखी कोणी त्या स्फोटाच्या कचाट्यात सापडले आहे का याचा शोध चालू आहे.

आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना या घटनेने धक्का बसला, अश्या शब्दात याचे वर्णन केले. त्यांनी तेथील जिल्हापदाधिकाऱ्यांची याबाबत चर्चा केली आहे. त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना योग्य तो उपचार मिळावा याची काळजी घेण्यास सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)