ब्राझिलमध्ये भूस्खलनामुळे 10 जणांचा मृत्यू 

साओ पाउलो (ब्राझिल) – ब्राझिलची राजधानी रियो डी जेनेरो येथे शनिवारी झालेल्या भूस्खलनात 10 जणांचा मृत्यू आणि 11 जण जखमी झाले आहेत. नीतरोईच्या मोरो डो बोआ स्परेंसा भागातील 11 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले असून 4 जण बेपत्ता आहेत.

सुरक्षितरित्या वाचवण्यात आलेल्यांमध्ये एक नवजात बाळ, 2 मुले आणि एका 33 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

-Ads-

नागरी सुरक्षारक्षक आणि अग्निशामक दल मिळून जवळजवळ 200 जण भूस्खलनग्रस्तांच्या बचावासाठी तैनात आहेत. पुढील 48 तास बचावकार्य चालेल, अशी माहिती त्यांनी दिली. रियो डी जेनेरो राज्यातील नीतेरोई भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रदेश प्रभावित झाला, असे सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)