स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी 10 किमी लांबीचा ट्रॅफिक जॅम 

नर्मदा (गुजरात) – स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी 10 किमी लांबीचा ट्रॅफिक जॅम झाल्याची माहिती देण्यात आली आहे. नर्मदा किनारी असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा पाहण्यासाठी दिवाळीच्या सुटीचा फायदा घेऊन पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. या गर्दीमुळे 10 किमी लांबीचा ट्रॅफिक जॅम झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

नर्मदा निगमच्या कार्यालयाजवळही तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शनिवारी 30,000 पेक्षा अधिक पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला आले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी होणारी अनिवार गर्दी लक्षात घेऊन नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आपली वाहने बाहेर पार्क करून बसने पुढील प्रवास करावा लागणार आहे.

-Ads-

दररोज फक्त 5,000 हजार पर्यटकांनाच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या गॅलरीमध्ये प्रवेश करता येईल असे गुजरात सरकार सतत स्पष्ट करत आले आहे. तरीही पर्यटक प्रचंड संख्येने केवडियाला येत आहेत. गेल्या तीन दिवसात स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी अनुक्रमे 16 हजार, 20 हजार आणि शनिवारी 30 हजार पर्यटक आले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला येणाऱ्या पर्यटकांमुळे सरदार सरोवर निगमला आतापर्यंत 50 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी 250 पेक्षा अधिक तंबू असलेली टेंट सिटी उभारण्यात आलेली आहे. ती हाऊसफुल्ल असून जवळपासच्या भागातील हॉटेल्समध्येही जागा शिल्लक नाहीत. सोमवार दिनांक 12 रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी देखभालीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)