गोव्यात उड्डाणनपुलाचा स्लॅब कोसळल्याने 10 जण जखमी

पणजी – बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळल्याने किमान 10 कामगार जखमी झाल्याची घटना पणजीत बुधवारी घडली. दक्षिण गोवा जिल्ह्यातील 15 किलोमीटर अंतरावर असलेले वेरणा या गावात दुपारी ही घटना घडली. उड्डाणपुलाच्या आधारासाठी लावण्यात आलेल्या दोन खांबांच्या मध्यभागी पुलाला तडा गेला.

घटनास्थळी तातडीने वेरणा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेतली. पुलावरील काम सुरू असताना ही घटना घडली. 10 कामगार जखमी झाले असून त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती वेरणा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

-Ads-

पणजी ते मार्गावा हा 30 किलोमीटर लांबीचा मार्ग राष्ट्रीय महामार्गास जोडण्यासाठी हा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. ही घटना घडली त्याच्या काही मीटर अंतरावर झुआरी नदीचा पूल आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)