अफगाणिस्तान हवाई हल्ल्यात 10 नागरिक ठार

काबुल (अफगाणिस्तान): अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्यात 10 नागरिक मारले गेल्याची माहिती अफगाण अधिकाऱ्यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या पक्तिया प्रांतात हे हवाई हल्ले झाले आहेत. मारल्या गेलेल्या नागरिकांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे आणि स्थानिका लोकांनी मृतदेह मांडून निदर्शने केल्याची माहिती प्रशासकीय परिषदेचे माजी सदस्य शाऊस्ता जान अहदी यांनी सांगितले.

हवाई हल्ल्यांमध्ये चार घूसखोर मारले गेल्याची माहिती देऊन प्रांतीय सरकारचे प्रवक्ते अब्दुल्ला हसरत यांनी सांगितले, की नागरिक मारले गेल्याच्या आरोपाची चौकशी करण्यात येत आहे. दुसऱ्या एका हवाई हल्ल्यात तालिबान प्रतिसरकारचे राज्यपाल आणि त्याचे दोन अंगरक्षक मारले गेल्याची माहिती प्रांत सरकारचे प्रवक्ते ओमर झ्वाक यांनी दिली आहे. या बाबतीत तालिबानकदून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. देशाच्या सुमारे अर्ध्या भागावर तालिबानचे प्रशासन आहे. मात्र हवाई हल्ले कोणी केले हे समजू शकलेले नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)