10 व्या धाम्मा संगितीच्या अध्यक्षपदी कविश्री उद्धव कानडे यांची निवड

पिंपरी – अशोक सर्वांगीण विकास सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी चक्रवर्ती धम्मसम्राट अशोक यांची जयंती व धम्म संगितीचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे या वर्षी चक्रवर्ती धम्मसम्राट अशोक यांची 2324 वी जयंती दिनांक 25 मार्च 2018 रोजी आली आहे. त्यामुळे संस्थेच्या वतीने यावर्षीची 10 वी धाम्मा संगिती करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदी कविश्री उद्धव कानडे यांची निवड केलेली आहे. त्यांनी 19 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्याक्षस्थान भूषविले आहे. तसेच, 4 थे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष स्थान भूषविले आहे. त्यांची विविध पुस्तके प्रकाशित झालेली आहे व त्यांना शासनाचे विविध पुरस्कारही मिळालेले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्‍तींचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आचार्य रतनलाल सोनाग्र (अध्यक्ष 6 वी धाम्मासंगिती आग्रा), योगेश बहल (विरोधी पक्षनेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), मानव कांबळे (अध्यक्ष, मानवाधिकार संघटना), शरद जाधव (अध्यक्ष, बौद्ध समाज विकास महासंघ), बंधुताचार्या प्रकाश रोकडे, आर.जी. गायकवाड, भन्ते नागघोष, सारंग पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक शिलवंत यांनी दिली. हा कार्यक्रम दि. 26 मार्च 2018 रोजी, दुपारी 4 वाजता श्रमशक्ती भवन, हॉटेल रात्नलोक शेजारी, जुना पुणे-मुंबई रोड, आकुर्डी येथे होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)