10 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन

रविवारी कार्यक्रम:विद्यार्थ्यानी त्वरीत सहभाग नोंदवण्याचे आवाहन
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) – दहावीच्या परीक्षेत 90 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन व्हिक्‍टर ऍकॅडमी, दैनिक प्रभात व इंगळे ग्रुपतर्फे रविवार, दि. 17 जून 2018 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात होणार आहे.या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
दहावीत चांगले गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध होतात. परंतु यापैकी कोणती निवडावी त्यातून भविष्यात त्याचा उपयोग पुढील आयुष्यात करिअर घडविण्यासाठी कसा करीता येईल या आणि अशा अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागते. याचे अचूक मार्गदर्शन करण्यासाठी या मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.
या करिअर मार्गदर्शनासाठी उस्मानाबाद येथील उप मुख्याधिकारी मा. मनोज राऊत, नाशिक येथील उपमुख्याधिकारीही मा. अनिल नगाणे तसेच मा. संग्राम भोसले (एम.टेक., आयआयटी, दिल्ली) व मा. डॉ. रजनी जगदाळे (एम.बी.बी.एस., एम.डी.) मायक्रो बायोलॉजी) या तज्ञव अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

विद्यार्थ्यांना आवाहन
90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले. मर्यादित प्रवेश असल्यामुळे त्वरित आपले नाव नोंदवावे. नाव नोंदणीसाठी नाव, मिळालेले गुणांची टक्‍केवारी, परीक्षा बैठक क्रमांक, आईचे नाव 7447442501 या क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठवून नावनोंदणी करावी असे आववाहन करण्यात आले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)