10 वर्षाच्या मुलीचा “स्वाईन फ्लू’ने मृत्यू

पिंपरी – शहरात “स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. शनिवारी एका दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या आजाराने अद्यापपर्यत मृत्यूची संख्या 31 वर पोचली असून दोन बाधित रुग्ण आढळले आहेत.

“स्वाईन फ्लू’ने राज्यभरात कहर केला आहे. यामध्ये, राज्यभरात सर्वात जास्त रुग्ण दगावण्याचे प्रमाण पिंपरी-चिंचवड शहरात आहे. शनिवार (दि. 6) यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) चिंचवड येथील मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णावर गेल्या तीन दिवसापासून उपचार सुरु होते.

-Ads-

या आजाराने जानेवारीपासून अद्यापपर्यत 221 बाधित रुग्ण आढळले आहेत. “स्वाईन फ्लू’ या आजाराला आळा घालण्यासाठी महापालिका दवाखाने व रूग्णालयांमार्फत जनजागृती केली जात आहे. तसेच, “टॅमी फ्लू’ गोळ्यांबरोबरच लसीकरण केले जात आहे. “स्वाईन फ्लू’ची लक्षणे दिसताच त्वरित उपचारासाठी डॉक्‍टरकडे जाण्याचे आवाहन, महापालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)