10 पैकी एका चिमुकल्याचा मृत्यू वायू प्रदूषणाने

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल : श्‍वासोच्छवासाचा त्रास वाढला

पुणे – शहरासह देशातील वाढत्या वायू प्रदुषणामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्‍याचे बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सरासरी 10 मुलांपैकी एका मुलाच्या मृत्युचे कारण हे वायू प्रदूषण असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आत्तापासून ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे, असे मत तज्ञ डॉक्‍टरांनी व्यक्त केले.

दूषित वातावरण हे भारतीय नागरिकांच्या आरोग्यासाठी एक प्रमुख धोका आहे. भारतामध्ये वय 15 वर्षांखालील सुमारे 1.8 अब्ज मुले दररोज जगभरात घरगुती व इतर वायू प्रदूषणामुळे संक्रमित श्‍वास घेतात. श्‍वासोच्छवासाठी सुरक्षित पातळीपेक्षा अधिक प्रदूषित असलेल्या हवेमुळे 98 टक्‍के मुले श्‍वासोच्छवास आणि फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त आहेत. शहरी भागात वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्‍यूआय) 127 नोंदविला आहे. जो प्रदूषणाच्या “मध्यम’ श्रेणीमध्ये येतो. ज्यामुळे अनेक लोकांना दीर्घकाल श्‍वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

“वाढती वाहतूक, काही भागात स्वयंपाक करण्याच्या जुन्या पद्धतींचा वापर आणि अपुरे कचरा व्यवस्थापन यामुळे प्रदूषण हे जागतिक आरोग्य संकट बनले आहे. वाढत्या वयातील मुले हे आपल्या आरोग्य वाढीसाठी इतरांपेक्षा अधिक हवेचा वापर करतात. तसेच त्यांची उंची जमिनीच्या जवळ असल्याने प्रदूषित कण त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतात. बालपणात त्यांचा मेंदू आणि शरीर विकसित होत असताना त्यांच्यावर गंभीर परिणाम होतो. कमी पातळीवर देखील वायू प्रदूषण मुलांच्या फुफ्फुसाचे नुकसान करते. त्यांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करते.

याबाबत डॉ. वैभव पंढारकर म्हणाले, “श्‍वसनासंबंधी आणि फुफ्फुसाच्या संक्रमणाने किंवा न्यूमोनियामुळे पीडित व्यक्तींमध्ये “क्रोनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) होतो. भारतातील वायू प्रदूषणाची पातळी जागतिक पातळीच्या दृष्टीने उच्चतम पातळीपैकी एक आहे. जी भारतात राहणाऱ्या लोकांसाठी धोकादायक आहे. आपण घन इंधनांमधून घरगुती वायू प्रदूषण कमी करण्यात प्रगती केली गेली असली, तरी काही ठिकाणी ही एक महत्त्वाची समस्या आहे. त्यामुळे आपली मुले स्वच्छ हवा आणि संसर्गविरहित जीवन जगू शकेल हे सुनिश्‍चित करण्यासाठी सभोवतालचे आणि घरगुती वायू प्रदूषण कमी असणे आवश्‍यक आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)