पिंपरी-चिंचवड : 10 कोटीचे रक्‍तचंदन जप्त

पिंपरी – बेकायदेशीररित्या रक्तचंदन घेऊन जाणारा कंटेनर वाकड पोलिसांनी सापळा रचून पकडला. या कंटेनरमध्ये सुमारे 10 कोटीचे रक्तचंदन असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ताथवडे जवळ गुरुवारी (दि. 26) सकाळी साडेनऊच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईहून मुंबईच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी ताथवडे जवळ पुणे – मुंबई द्रूतगती महामार्गावर सकाळी साडेनऊच्या सुमारास सापळा रचला. ताथवडे येथे कंटेनर आला असता पोलिसांना तो अडवला. त्यामध्ये पाहणी केली असता रक्तचंदन आढळून आले. याबाबत पोलिसांनी वनविभागास कळविले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रक्तचंदनाची पाहणी केली. त्यांनी हे रक्तचंदन सुमारे 10 कोटी रुपयांचे असल्याचा अंदाज वर्तविला.

आयुर्वेदीक औषधांमध्ये रक्तचंदनाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कर्नाटक भागात रक्तचंदनाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. मात्र साताऱ्यावरुन निघालेला हा कंटनेर नेमका कोणाच्या मालकीचा आहे व आत भरलेला रक्तचंदनाचा साठा कोणासाठी नेण्यात होता याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. वाकड पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)