10 ऑगस्टला पीएफचा तक्रार निवारण कार्यक्रम

पुणे – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे सदस्यांच्या तक्रार निवारणासाठी निधी आपके निकट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 10 ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा ते साडे बारा या अवधीत दोन ठिकाणी होणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी क्षेत्रिय कार्यालय, गोळीबार मैदान येथे आणि आर आय ए स्टेट बॅंक ऑफ इंडिया समोर रांजणगाव एमआयडीसी अशा दोन ठिकाणी हे उपक्रम वरील वेळात राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी ज्यांच्या तक्रारी किंवा अडचणी आहेत त्यांनी त्या विषयीची माहिती 10 ऑगस्ट पुर्वी पीएफ कार्यालयात जमा करावी असे आवाहन भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त अरूणकुमार यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)