10 आरोपींकडून 21 गुन्हे उघड

पिंपरी – निगडी पोलिसांनी 10 आरोपींसह तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून खून, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे एकूण 21 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

ऑटो क्‍लस्टर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पिंपरी-चिंचवड अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी ही माहिती दिली. वाहन चोरी करणारे रवी नरसप्पा रेड्डी (वय-22 रा. सुदर्शननगर, आकुर्डी) शक्तिकेश शिवकुमार प्रजापती (वय- 18 रा. चिंचवड), अरबाज रियाज पठाण (वय-19), विशाल कमलाकर डोंगरे (वय-19, दोघे रा. ओटास्कीम, निगडी) यांना अटक करत एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल, सहा जिवंत काडतूस, एक मॅग्झिन स्टील प्लेटींग व एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला.

तसेच प्रेम प्रकरणातून खून करुन त्याचा पुरावा नष्ट करणारे धन पठाणी कामी (वय-42, रा. चिखली), खेमराज राणा कामी (वय-25, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. नेपाळ) तसेच त्यांची साथीदार पूजा रामसिंग ढकलवार (वय-25, रा.चिखली) अशी खून प्रकरणातील अटक आरोपींची नावे आहेत. तसेच निगडी पोलिसांनी केलेल्या कारवाई नुसार सराईत आरोपी साजन मन्नू मेहरा (वय-25, रा. देहुरोड) याला पोलिसांनी दोन पिस्तूल व सहा जिवंत काडतूस तसेच एक स्टील प्लेटींग मॅग्झिनसह अटक केले. साजन याच्यावर देहुरोड पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे यासह बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे पाच गुन्हे दाखल आहेत. या आरोपींसह पोलिसांनी लॅपटॉप चोरी प्रकरणी पोलिसांनी आनंद त्र्यबंक इंदुकाने (वय-22, रा. वाल्हेकरवाडी,चिंचवड) यालाही अटक केली आहे.

या तपासामध्ये निगडी पोलीस ठाण्यातील आठ, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 2 व वाकड पोलीस ठाण्यातील 1, खडक पोलीस ठाण्यातील एक, पिंपरी पोलीस ठाण्यातील 3, सांगवी पोलीस ठाण्यातील 1 व दिघी पोलीस ठाण्यातील 1 अशा 17 वाहन चोऱ्यासह खून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, लॅपटॉप चोरी असे एकूण 21 गुन्हे उघडकीस आणत 6 लाख 16 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)