न्यायालय अवमानना प्रकरणी नागेश्‍वर राव यांना 1 लाख रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

नवी दिल्ली : तत्कालीन सीबीआय प्रभारी नागेश्‍वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाने एक लाख रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत कोपऱ्यात खुर्चीवर बसण्याचे शिक्षा सुनावली. न्यायालय अवमानना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तत्कालीन सीबीआय प्रभारी एम नागेश्‍वर राव आणि सीबीआयचे कायदेशीर सल्लागार एस भासूराम यांना दोषी ठरवले आहे.

दोघांनीही न्यायालयाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवमानना केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सीबीआयचे संयुक्त संचालक एके शर्मा यांची बदली करू नये असे न्यायालयाचे आदेश असतानाही त्यांनी त्यांची सीआरपीएफचे अतिरिक्त महासंचालक म्हणून 17 जानेवारी रोजी बदली केली होती. एके शर्मा हे त्या वेळी बिहार निवारा केंद्रातील लैंगिक अत्याचार प्रकरणांचा तपास करत होते. आणि त्यांची बदली करू नये असा कोर्टाचा आदेश होता.

एम नागेश्‍वर यांनी चूक मान्य करून न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली होती. मात्र त्यांची माफी स्वीकार्य नसल्याचे सांगून न्यायालयाने त्यांना सुनावले की त्यांची शिक्षा 30 दिवस तुरुंगवासाची असू शकली असती. 7 फेब्रुवारीला न्यायालयाने आपल्या आदेशाचा अवमान करून एके शर्मा यांची सीबीआय बाहेर बदली केल्याबद्दल खरडपट्टी काढली होती. आणि राव यांनी त्यापूर्वी दोन वेळा न्यायालयाच्या आदेशाची अवमानना केल्याचे म्हटले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)