दोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरू : पियुष गोयल

नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट बॅंक आणि टपाल विभागाच्या एकत्रित प्रयत्नातून पोस्ट पेमेंट बॅंकच्या शाखा देशभर उघडल्या गेल्या आहेत. दोन वर्षात 1.55 लाख पोस्ट पेमेंट बॅंक सुरु केल्याने बॅंकिंग सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्यात येतील. या बॅंकांमुळे आर्थिक समावेशनाची नवभारताची कल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात येईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

पोस्ट पेमेंट बॅंकच्या प्रायोगिक प्रकल्पाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी केंद्रीय दळण-वळण आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा देखील उपस्थित होते. इतक्‍या कमी काळात बॅंकांच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या बॅंकांमुळे डिजिटल पेमेंट सुलभ पद्धतीने लोकांपर्यंत पोहचून लोकप्रिय होण्यास मदत होईल, असे सिन्हा म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी वित्तीय समावेशनाची संकल्पना विशद करणाऱ्या एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त चित्रकार सतीश गुजराल यांनी हे टपाल तिकीट तयार केले तसेच “ब्रेकिंग बॅरिअर्स’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. पोस्ट पेमेंट बॅंकच्या दोन वर्षातल्या प्रवासाचे चित्रमय वर्णन या पुस्तकात आहे. यावेळी टपाल क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी आणि पोस्टमन यांचा मनोज सिन्हा यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)