1, 2 डिसेंबरला राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची प्रवेशपरीक्षा

महाराष्ट्रातून 268 विद्यार्थ्यांचा अर्ज : उत्तीर्णाला वर्षाला 40 हजार शिष्यवृत्ती

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने डेहराडून येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची (आरआयएमसी) प्रवेश पात्रता परीक्षा येत्या 1 व 2 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून या परीक्षेला 268 विद्यार्थी बसणार आहेत.

-Ads-

राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची (राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज) प्रवेश पात्रता परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येत असते. जून व डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये ही परीक्षा होत असते. इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या किंवा सातवीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसता येत असते. या परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी इंग्रजी, गणित, सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असणार आहेत. 1 डिसेंबरला सकाळी 10 ते 12 या वेळेत 125 गुणांचा इंग्रजी या विषयाचा पेपर होणार आहे. दुपारी 2 ते 3.30 या वेळेत गणित या विषयाचा 200 गुणांचा पेपर होणार आहे. 2 डिसेंबरला सकाळी 10 ते 11 या वेळेत सामान्यज्ञान या विषयाचा 75 गुणांचा पेपर होणार आहे. इंग्रजी अथवा हिंदी या भाषेत हे पेपर असणार आहेत. लेखी परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती 4 एप्रिल 2019 रोजी घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातून दोघांचीच होणार निवड
या परीक्षेतून देशातील केवळ 50 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. यात जूनमधील परीक्षेतून 25 आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेतून 25 या प्रमाणे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. महाराष्ट्रातून 268 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. या परीक्षेसाठी पुण्यातच एक केंद्र असणार आहे. महाराष्ट्रातून केवळ दोनच विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला वर्षाला प्रत्येकी 40 हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्तीही मिळणार आहे. आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण होऊपर्यंत ही शिष्यवृत्ती चालू राहणार आहे. बारावीनंतर थेट पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश मिळविता येणार आहे.

या परीक्षेचे प्रवेशपत्र पोस्टाने विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले असून संकेतस्थळावर ऑनलाइनही प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)