1, 2 डिसेंबरला “आरआयएमसी’ची प्रवेश परीक्षा

महाराष्ट्रातून 268 उमेदवार : दोनच विद्यार्थ्यांची होणार निवड

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची (आरआयएमसी) प्रवेश पात्रता परीक्षा येत्या 1 व 2 डिसेंबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून 268 विद्यार्थी त्यास बसणार आहेत.

-Ads-

इयत्ता सहावी किंवा सातवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना या परीक्षेसाठी बसता येते. वर्षातून दोनदा जून व डिसेंबर या महिन्यात ही परीक्षा होते. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची ही परीक्षा असणार आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठविण्यात आले असून ऑनलाइनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. येत्या शनिवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत इंग्रजी विषयाचा 125 गुणांचा, तर दुपारी 2 ते 3.30 या वेळेत गणित या विषयाचा 200 गुणांचा पेपर होणार आहे. रविवारी सकाळी 10 ते 11 यावेळेत सामान्यज्ञान या विषयाचा 75 गुणांचा पेपर होणार आहे. एकूण 400 गुणांची लेखी परीक्षा व 50 गुणांची तोंडी असणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील रास्ता पेठेतील कॅन्प एज्युकेशन सोसायटीच्या राजा धनराजगिरजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्होकेशनल विभाग या ठिकाणी परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे. 1 केंद्र संचालक, 14 पर्यवेक्षक, 2 लिपीक, 3 शिपाई अशी मनुष्यबळाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

या परीक्षेतून महाराष्ट्रातून केवळ दोनच विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 40 हजार रुपये एवढी शिष्यवृत्ती पाच वर्षांसाठी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना थेट आठवी ते बारावीपर्यंतच्या सैनिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)