1 हजार 283 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

आज होणार फैसला : 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 70 टक्के मतदान
नगर – जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 70 टक्के मतदान झाले. सदस्यांच्या 632 जागेसाठी 1 हजार 87 तर सरपंचाच्या 70 जागेसाठी 196 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अशा एकूण 1 हजार 283 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले असून, याची मतमोजणी उद्या संबंधित तालुक्‍यांचे तहसील कार्यालयात होणार आहे.
निवडणुकीत 816 जागांपैकी 141 जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. यात तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अर्ज माघारीच्या दिवशी बोरबन (ता. संगमनेर), गंगापूर (ता. राहुरी) व शेकटे बुद्रूक (ता. शेवगाव) या ग्रामपंचायती सरपंच व सर्व सदस्यांसह बिनविरोध ठरल्या. संवेदनशील मतदान केंद्रांवर आवश्‍यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्र अधिकारी आपापल्या मतदान केंद्रावर शनिवारी रात्रीच दाखल होते.
आज 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. बहुतांशी ग्रामपंचायतीत मतदानासाठी सर्वच बुथवर गर्दी केली होती. या 70 ग्रामपंचायतींसाठी 59 हजार 503 महिला तर 65 हजार 151 मतदार होते. निवडणुकीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही ग्रामपंचायतींसाठी 65 टक्के तर काही ग्रामपंचायतींसाठी 80 टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी किरकोळ वाद वगळता बहुतांशी ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी मोठा उत्साह दिसून आला. मतदानासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहयला मिळत होती. प्रशासनानेही या निवडणुकीसाठी मोठी तयारी केली होती. उद्या मतमोजणी होणार असून, रिंगणातील उमेदवारांचा फैसलाही आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
अकोले-9, संगमनेर-1, कोपरगाव-9, श्रीरामपूर-5, राहाता-1, राहुरी-10, नेवासा-5, नगर-1, पारनेर-5, पाथर्डी-7, शेवगाव-10, कर्जत-5, जामखेड-1, श्रीगोंदा-1 अशा एकूण 70 ग्रामपंचायतींसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)