1 एप्रिलपासून लागणार खिशाला कात्री

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल होणार आहेत. तुमच्या किचनचं बजेट वाढणार आहे. गृहोपयोगी अनेक वस्तूंचे दर वाढणार आहेत. सर्व प्रकारच्या उत्पन्‍नावरील प्राप्तीकरावर 1 टक्‍का अतिरिक्‍त उपकर (सेस) नव्या आर्थिक वर्षापासून भरावा लागणार आहे.

त्याशिवाय अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेले अनेक नवीन करप्रस्ताव रविवारपासून लागू होतील. त्यात शेअर विक्रीवरील दीर्घकालीन भांडवली नफा कर, तीन ऐवजी चार टक्के आरोग्य आणि शिक्षण ‘सेस’, ज्येष्ठ नागरिकांना 50 हजारांपर्यंत व्याजावर आयकरात सूट यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

याशिवाय बहुचर्चित ई-वे बिल प्रणाली लागू होत आहे. 250 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणार्‍या व्यावसायिकांवर कॉर्पोरेट करात कपात करून 30 ऐवजी 25 टक्के करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)