1ली-2री चा गृहपाठ आणि स्कूलबॅग्जच्या वजनाबाबत सरकारी आदेश जारी 

नवी दिल्ली – इयत्ता 1ली आणि 2री साठी गृहपाठ आणि सर्व वर्गांच्या स्कूलबॅगच्या वजनाबाबत सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे होमवर्क द्यायचे नाही, असे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले असून वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅगचे कमाल वजन किती असावे याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

मनुष्य बळ विकास मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅगचे वजन 1.5 किलोग्रॅमपेक्षा अधिक असू नये, इयत्ता 3री ते 5वी च्या विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅगचे वजन 2 ते 3 किलोग्रॅम, इयत्ता 6वी आणि 7 वी विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅगचे वजन 4 किलोग्रॅम, इयत्ता 8वी आणि 9 वी च्या विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅगचे वजन 4.5 किलोग्रॅम, आणि 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅगचे वजन 5 किलोग्रॅमपक्षा अधिक असू नये असे सुचविण्यात आले आहे.

क्रमिक पुस्तकांबाबतही सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार इयत्ता 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणिताशिवाय अन्य कोणतेही क्रमिक पुस्तक लावू नये, 3री ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित आणि ईव्हीएस (पर्यावरणशास्त्र) याच विषयांची क्रमिक पुस्तके लावावीत. ही सर्व पुस्तके एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमानुसार असावीत. आणि स्कूलबॅग्जचे वजन ठरवून दिलेल्या वजनापेक्षा जास्त असू नये. मनुष्य बळ विकास मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे पूर्णत: पालन करण्याबाबत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांना आदेश देण्यात आलेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)