शहरात खळबळ ; स्वागरेट पोलीस ठाण्यात नोंद
पुणे,दि.16 – स्वारगेट परिसरातील एका शाळेच्या मैदानावर पुरुषाचे गुप्तांग सापडले. यामुळे मोठी खळबळ उडाली असून स्वारगेट पोलिसांनी स्टेशन डायरीत नोंद करुन तपास सुरु केला आहे.
यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले, स्वारगेट परिसरातील एका शाळेच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना हे गुप्तांग दिसले. त्यांनी शाळेतील स्टाफला याची तात्काळ माहिती दिली. शाळेतील स्टाफने स्वारगेट पोलिसांना याची खबर दिली. स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन फॉरेन्सीक लॅबला पाचारण केले. फॉरेंन्सिक लॅबने हे गुप्तांग ताब्यात घेऊन डिएनए टेस्टसाठी पाठवले आहे. याप्रकरणी स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली आहे.