– नितीन गडकर, नाना पटोले, हंसराज अहिर, भावना गवळी, कृपाल तुमाने यांचे भवितव्य ठरणार
मुुंबई – 17 वी लोकसभा अस्तित्वात येण्यासाठी उद्या, गुरूवारी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात देशातील 18 राज्ये आणि 2 वेैंदशासित प्रदेशांतील 91 मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये विदर्भातील सात मतदारसंघाचा समावेश असून या पहिल्या टप्प्यात भाजपाचे नितीन गडकरी व हंसराज अहिर या दोन वेैंद्रिय मंत्र्यांबरोबरच कॉंग्रेसचे नाना पटोले, मावळते खासदार रामदास तडस, भावना गवळी, कृपाल तुमाने व अशोक नेते आदी दिग्गज्जांची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सतराव्या लोकसभेसाठीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम अशा सात मतदारसंघात मतदान होत आहे. या 7 मतदारसंघात एवूैण एवूैण 116 उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरले असून त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद करण्यासाठी सुमारे 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार सज्ज झाले आहेत. त्यामध्ये 66 लाख 71 हजार पुरुष तर 63 लाख 64 हजार महिला आणि 181 तृतीयपंथी मतदार आहेत. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, मागासलेपणा, बेरोजगारी या सतत चर्चेत असलेल्या समस्यांच्या पाश्वभूमीवर विदर्भातील मतदार आपल्या मताचे दान कोणाच्या पदरात टाकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यातील सुमारे 1400 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार असून त्यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा देखील समावेश आहे. राज्यात सर्वाधिक 30 उमेदवार नागपूर मतदार संघात असून सर्वात कमी 5 उमेदवार गडचिरोली-चिमूर मतदार संघात आहे. 7 मतदार संघामध्ये 44 हजार ईव्हीएम यंत्र (बॅलेट युनिट आणि सेंट्रल युनिट) आणि 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. सुमारे 73 हजार 837 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
– निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
– यंदा सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक अधिकारी हे लाइव्ह वेबकास्ट पाहणार आहेत.
– 15 पेक्षा जास्त उमेदवार तसेच मतदान यंत्रावरील “नोटा’ पर्याय यामुळे अशा मतदान केंद्रांवर 2 बॅलेट युनिट बसविण्यात येतात.
-पहिल्या टप्प्याकरिता 26 हजार बॅलेट युनिट आणि 18 हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून 20 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.