पुणे,दि.18-लिफ्ट देणाऱ्याच्याच डोक्यात बिअरची बाटली घालून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना शुकव्रारी रात्री घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी संतोष रामचंद्र कांबळे(40,रा.आकाश पार्क,धानोरी) हे रस्त्याने जात असताना त्यांना दोघांनी लिफ्ट मागितले. त्यांनी दोघांनाही गाडीवर बसवले. गाडी थोडी पुढे गेल्यावर त्यांनी लघुशंकेसाठी गाडी थांबविण्यास सांगितली. गाडी थांबवली असता, त्यातील एकाने त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे करत आहेत.