निर्माता-दिग्दर्शक कबीर खान यांचा 1983 मधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघावर आधारित ’83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग या सिनेमामध्ये भारतीय संघांचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या चित्रपटाची तयारी करण्यासाठी आणि कपिल देव यांचा आणखी जवळून अभ्यास करण्यासाठी रणवीर सध्या कपिल देव यांच्या घरी राहत आहे. रणवीर जवळपास दहा दिवस कपिल देव यांच्या घरी राहणार आहे. रणवीर सिंगने कपिल देव यांच्या बरोबर गप्पा मारतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/p/Bx30Zhxh39E/?utm_source=ig_web_copy_link
सध्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे रणवीर आणि त्याच्या संपूर्ण टीमचे ट्रेनिंग सुरु आहे. ‘83’ सिनेमाचे शूटिंग सुरु होण्याआधीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 10 एप्रिल 2020 मध्ये ’83’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे.
https://www.instagram.com/p/Bx30eA-B7Z5/?utm_source=ig_web_copy_link