राजगुरूनगर- गुढी पाडवा सण व मराठी नवीन वर्षात खेड तालुक्यात शांतता आणि सामाजिक सुरक्षा राहावी यासाठी महिला दक्षता समिती, महिला सुरक्षा समिती व खेड पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस ठाण्यात सामाजिक शांततेची गुढी उभारण्यात आली.
शिवसेना जिल्हा महिला संघटक विजया शिंदे, भाजप महिला मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षा क्रांती सोमवंशी, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या हस्ते ही गुढी उभारण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेखा क्षात्रिय, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, भाजप पुणे जिल्हा महिला सचिव मोहिनी राक्षे, मनसेच्या जिल्हा अध्यक्षा डॉ. नीता आल्हाट, सुरेखा कड, वैशाली मालकर, सविता फापाळे, लता परदेशी, अरूणा घुले, संगिता तनपुरे, पोलीस हवालदार सारिका बनकर, सुरेखा बोरकर, सारिका बोरकर, सीमा पाटील, मेघा थिगळे, पूजा गारगोटे, सीमा कडूसकर यांच्यासह महिला दक्षता व सुरक्षा समितीच्या महिला, खेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपस्थित होते. यावेळी मराठी नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या सणाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.