आयएसआयच्या महिला हस्तकाच्या होता संपर्कात
जयपूर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन लष्करी जवानाना बुधवारी राजस्थानमध्ये अटक करण्यात आली. ते पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या (आयएसआय) महिला हस्तकाच्या संपर्कात असल्याचे उघड झाले.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव विचित्र बेहरा आणि लान्स नायक रवी वर्मा असे आहे. तो राजस्थानच्या पोखरणमध्ये रूजू होता. हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून त्याच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवली जात होती. सुमारे दोन वर्षांपूर्वी बेहराची पाकिस्तानी महिलेशी सोशल मीडियावरून ओळख झाली. त्यानंतर ते फेसबुक आणि व्हॉटस् ऍपवरून सातत्याने संपर्कात होते. त्यांच्यात अनेकदा व्हिडीओ कॉलिंगही व्हायचे.
मैत्री वाढल्यानंतर पाकिस्तानी महिला हस्तकाने बेहराला भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती देण्यास भाग पाडले. ती माहिती खरी निघाल्यास ती हस्तक बेहराच्या बॅंक खात्यावर पैसे जमा करत होती. संबंधित प्रकरणाची अतिशय गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. त्याच्या आणखी एक साथीदाराला अटक करण्यात आली. सुटीला गावी जात असताना रेल्वे स्थानकातून त्यांना ताब्फ्यात घेण्यात आले.
हेरगिरीमध्ये आणखी कुणी सामील आहेत का याचा कसून तपास केला जात आहे. संशयावरून बेहराच्या लष्करातील आणखी एका सहकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्याच्याविषयीची अधिक माहिती उघड करण्यात आली नाही.