वडगाव जलशुध्दीकरण केंद्राअंतर्गत वितरण व्यवस्थेत बदल
पुणे : वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे शहरातील पाण्याची मागणी 10 ते 15 टक्के वाढली असल्याने, महापालिकेचे पाणी पुरवठयाचे नियोजन मागील आठवडयापासून कोलमडले आहे. त्यामुळे शहराच्या उपनगरीय भागातील नागरिकांना पाणी देण्यासाठी महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठयात दरदिवशी काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेऊन हे पाणी शहरातील इतर भागासाठी वळविण्यात येणार आहे. येत्या 10 जून पासून हे पाणी नियोजन लागू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या जलकेंद्राची क्षमता सुमारे 250 एमएलडी प्रतीदिन असून त्यातील 30 एमएलडी पाणी दररोज इतर भागासाठी वळविले जाणार आहे.
प्रभातच्या वृत्तावर शिक्कामोर्तब
दरम्यान, शहरात महापालिकेकडून छुपी पाणी कपात सुरू असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने दिले होते. त्यामुळे शहरातील उपनगरीय भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याची माहीतीही दिली होती. महापालिकेकडून पाण्याच्या फेरनियोजना बाबत घेतलेल्या या निर्णयामुळे दैनिक प्रभातच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले असून या भागाला काही प्रमाणात का होईना पण पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे शहरात पाण्याची मागणी वाढलेली आहे. सध्या महापालिकेकडून शहरात प्रतिदिन 1350 एमएलडी पाणी पुरवठा केला जात असली तरी, प्रत्यक्ष मागणी 1450 ते 1480 एमएलडीची आहे. त्यामुळे या मागणी एवढा पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून गेल्या दोन आठवडयापासून शहरात 10 ते 15 टक्के छुपी पाणी कपात करण्यात येत आहे. परिणामी, शहरात जलवाहीनीचा शेवटचा भाग असलेल्या परिसरातील नागरिकांना दोन ते तीन दिवस पाणीच मिळत नसून हे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांच्या रोषाचा सामना महापालिका अधिकाऱ्यांना करवा लागत असल्याने प्रशासनाकडून त्यावर तोडगा काढण्यासाठी वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठयाचे फेर नियोजन केले असून या जलकेंद्रा अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे सात भाग करण्यात आले असून प्रत्येक भागाला आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे. येत्या 10 जून पासून या नवीन नियोजनाची अंमलबाजवणी केली जाणार आहे.
कोणत्या दिवशी कोणत्या भागात पाणी बंद
रविवार :- बाबुराव सणस विद्यालय परिसर, उत्कर्ष सोसायटी परिसर, लेन नं. 125 ते परिसर,
चव्हाणबाग, डि. एस. के. वेंकटेश सेव्हींग परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर इ. धायरी.
सोमवार :- भारती विापीठ परिसर, चंद्रभागा नगर, फालेनगर, बाळकृष्ण सोसायटी, राजमुद्रा सोसायटी,
अक्षय नगर, आंबेगाव पठार स.नं. 15 ते स.नं. 41 इ.
मंगळवार :- सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल
गंगा, आनंद विहार, सनसिटी, हिंगणे परिसर,
बुधवार :- सहकारनगर, धनकवडी गाव, स. नं. 2, 3, बालाजीनगर, इ.
गुरूवार :- कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, गोकुळनगर, शिवशंभो नगर, भारतनगर,
राजस सोसायटी, भूषण व इंद्रप्रस्थ सोसायटी, सुखसागर नगर भाग व भाग
शुक्रवार :- संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, अंजलीनगर, जांभुळवाडी रस्ता, टेल्को कॉलनी, लेक –
विस्टा सोसायटी परिसर
शनिवार :- राजीव गांधी नगर, चैत्रबन वसाहत, पद्मावतीनगर, अंबिका नगर, पवन नगर, श्रेयस नगर,
काकडे वस्ती, अशरफ नगर, ग्रीन पार्क, हगवणे वस्ती, कोंढवा बुद्रुक गाव, पुण्यधाम आश्रम
रस्ता, कामठेनगर, बधे वस्ती, टिळेकरनगर, साईनगर, गजानन नगर, येवलेवाडी.